प्लेटूमी ओरिजनल्स या नव्या शृंखलेची प्लेटूमी कडून घोषणा
Ekach Dheya
मुंबई: भारताचे पहिले लाईव्ह करमणूक व्यासपीठ प्लेटूमीने ‘प्लेटूमीऑरिजनल्स’ या शृंखलेची घोषणा करत ओरिजनलकंटेंट क्षेत्रात प्रवेश केला आहे. या नव्या शृंखलेद्वारे कलाकारांना त्यांची कला चाहत्यांसमोर तसेच या क्षेत्रांतील दिग्गजांसमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कलाकारांना त्यांच्या चाहत्यांशी कोणत्याही सीमेचे बंधन न राहता जोडता यावे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले हे व्यासपीठ आता देशाच्या दुर्लक्षीत भागातून ओरिजनल कंटेंट आणून उलथापालथ करण्याचा प्रयत्न करत आहे.
कलाकारांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देताना, प्लेटूमी कंटेंटच्या वितरण, प्रसिद्धी आणि व्यावसायिक अंगाकडे लक्ष देणार आहे. गाण्यांबरोबरच कंटेट मध्ये परफॉर्मन्स आर्टिस्ट्सचे विविध प्रकारचे परफॉर्मन्स आणि त्यांनी तयार केलेल्या स्वत:च्या कलाकृती असतील. प्लेटूमी या कलाकृतींना सर्व अॅप्लिकेशन्स सहित सर्व व्यासपीठांवर प्लेटूमीओरिजनल्स या बॅनरखाली प्रसिद्धी देणार आहे.
या नव्या शृंखलेचे अनावरण करताना, प्रसिद्ध कन्नड संगीत दिग्दर्शक विनय चंद्र यांनी संगीतबद्ध आणि गायलेले ‘अल्विदा’ हे दिवंगत अभिनेता सुशांतसिंग रजपूतला समर्पित गीत प्लेटूमीने प्रसिद्ध केले आहे. नवीन कंटेट हे मोफत उपलब्ध असेल जेणेकरून चाहत्यांना आनंद घेता येऊ शकेल.
प्लेटूमीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्थिवासन सुब्रमणियन यांनी सांगितले की, “कमकुवत आर्थिक बाजूमुळे होतकरू कलाकार त्यांच्या कलेला व्यावसायिक पातळीवर पुढे नेऊ शकत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. प्लेटूमी कलाकारांना त्यांच्या कलेला सादर करण्यासाठी आणि व्यावसायिक संधी देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आले आहे. भारतातील अगदी दुर्गम भागातील कलाकारांमध्येही आम्ही लोकप्रियता मिळवली आहे. आमचे व्यासपीठ या कलाकारांना योग्य व्यासपीठ देऊ शकेल. आमच्याकडून घडत असलेल्या यशोगाथांनी आम्ही भारावून गेलो आहोत. प्लेटूमीओरिजनल्स सादर करून आम्ही लाइव्ह सादरीकरणांच्या पुढे जाणार आहोत आणि कलाकारांनी मेहनतीने निर्माण केलेल्या सर्वांग सुंदर कलाकृती आम्ही सादर करणार आहोत.”
या वर्ष अखेर पर्यंत प्लेटूनऑरिजनल्सच्या अंतर्गत १०० पेक्षा जास्त गीते/सादरीकरणांचे प्लेटूमीचे ध्येय आहे. कलाकारांना एक व्यापक विश्व देऊ करण्याचे आणि बरोबरीने वापरकर्त्यांच्या पंसतीस उतरेल असे कंटेंट देण्याची संकल्पना यामागे आहे.