Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नाशिक महापालिकेचं २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी करवाढ नसलेलं २ हजार ३६१ कोटी ५६ लाख रुपयांचं अंदाजपत्रक सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक महापालिकेचं सन २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठीचं, कोणतीही करवाढ नसलेलं २ हजार ३६१ कोटी ५६ लाख रुपयांचं अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांना सादर केलं. या अंदाजपत्रकात कोविड चाचणी प्रयोगशाळा, तसंच स्मार्ट स्कूल या प्रकल्पासाठीही तरतूद केली आहे.

या अंदाजपत्रकात घर पट्टी वाढवली नसली, तरी वापरानुसार पाणी पट्टीचे दर असावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. त्यासाठी टेलीस्कोपीक जलमापकाची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.अंदाज पत्रकात रस्ते विकासाकरता २१० कोटी रुपये, पाणी पुरवठा विभागासाठी १२७ कोटी रुपये, तर विद्युत व्यवस्थेसाठी २५ कोटी ७४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागासाठी ३२ कोटी ६३ कोटी रुपयांची तरतूद असून शिक्षण विभागासाठी १३३ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

नगरसेवक निधी म्हणून प्रत्येक नगरसेवकासाठी साडेदहा लाख रुपये अशी एकूण १३ कोटी ३४ लाख, तर नव्यानं सुरू होणाऱ्या परिवहन सेवेसाठी १०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Exit mobile version