Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हवाई मार्गानं भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफिका आणि ब्राझील या देशांमध्ये कोरोनाचे २ नवीन विषाणू आढळून आल्यानं भारतात बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांना काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

या अटी ब्रिटन, युरोपीय देश आणि मध्य पूर्वेतील देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना लागू असतील. या प्रवाशांनी एअर सुविधा पोर्टल वर आपल्या आजाराविषयी स्वयं घोषणापत्र अपलोड कराव लागणार आहे.

तसेच त्यांना कोविडच्या आय टी पी सी आर चाचणीचा रिपोर्टही अपलोड करावा लागणार आहे. ही चाचणी प्रत्यक्ष प्रवासाच्या ७२ तास आधी करावी लागणार आहे. गरजेनुसार १४ दिवसांच्या गृह विलगीकरणाची हमीही त्यांना द्यावी लागणार आहे.

Exit mobile version