देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर गेली आहे.
अवघ्या महिनाभरात देशानं हा मैलाचा दगड पार केला आहे. काल देशभरात ६ लाख ५८ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. काल १० हजार ८९६ रूग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी ६ लाक ६७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल १३ हजार १९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात उपाचाराधीन रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे. सध्या हे प्रमाण एकूण बाधितांच्या तुलनेत फक्त १ पूर्णांक २७ शतांश टक्के आहे.