Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार – हर्ष वर्धन श्रींगला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार असून दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध सामान्य असू शकत नाहीत असे मत परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांनी व्यक्त केले आहे. ते काल मॉस्को येथे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या राजनैतिक अकादमीमध्ये बोलत होते.

लद्दाखचा पेगांग तलावाच्या क्षेत्रात सैन्य मागे घेण्याचे काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल असेही श्रींगला यांनी यावेळी सांगितले. सीमारेषेबाबतचे मुद्दे बाजूला ठेवण्याचा निर्णय १९८० च्या दशकात दोन्ही देशांनी घेतला होता. मात्र गेल्या दोन वर्षांच्या घटनांमुळे दोन्ही देशांतील संबंध प्रतिकूल झाले असल्याचं श्रींगला यावेळी म्हणाले.

Exit mobile version