नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे आदेश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासह क्ललब, उपाहारगृहे, होम क्वारंटाईन, तसंच इतर खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
आयुक्तांच्या निर्देशानंतर अशा कार्यक्रम ठिकाणी धाडी टाकून कठोर कारवाईला सुरुवातही झाली आहे. याशिवाय मास्काचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये ३०० मार्शल्सची नियुक्ती केली असल्याची माहिती प्रशासनानं दिली.