Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भरविण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भरविण्यात येणार आहे. गांधीनगर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग या केंद्रातर्फे आयोजित या उपक्रमामध्ये केंद्रातर्फे तैय्यार करण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी ७५ प्रकारची खेळणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अशा पद्धतीचा उपक्रम राबविणारी ही देशातील एकमेव तंत्रज्ञान संस्था असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैज्ञानिक खेळणी आणि उपकरणं बनविण्यासाठी प्रवृत्त करण्याकरता तिथं जाणीवपूर्वक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

शिक्षणानं विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना देऊन त्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित केलं पाहिजे. त्याकरिता असे उपक्रम गरजेचे असल्याचं या केंद्राचे संस्थापक मनीष जैन यांनी आकाशवाणीला सांगितलं.

Exit mobile version