संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेनं सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणं यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.