Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलान केलेल्या बालाकोट कारवाईला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि आपल्या जवानांची सुरक्षा सर्वोपरी आहे असे शहा यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाने नव्या भारताची दहशतवादाविरुद्धची धोरणे स्पष्ट केली आहेत.

२६ फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तानच्या बालाकोट इथल्या अतिरेकी प्रशिक्षण स्थळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला केला होता. जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी, वरिष्ठ कमांडर, जिहादी समूह मोठ्या संख्येने या प्रतिहल्ल्यात मारले गेले.

१४ फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने पुलवामा इथ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.

दहशतवादाविरोधात आपण कडक कारवाई करत असल्याचे भारताने यशस्वी बालाकोट प्रतीहल्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिह यांनी म्हटले आहे.

हवाई दलाच्या धैर्य आणि परिश्रमाचे त्यानी कौतुक केले असून देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या आपल्या संरक्षण दलांचा अभिमान आहे असेही ते म्हणाले.

Exit mobile version