देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १ कोटी ६६ लाख १६ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ९ लाख ९४ हजार ४५२ मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाख २६ हजाराच्यावर गेली आहे. काल १७ हजार ४०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी ११ लाख ५६ हजाराच्यावर गेली आहे.
सध्या देशभरात १ लाख ७३ हजार ४१३ अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल ८९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ५७ हजाराच्यावर गेली आहे.