Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्र सरकारकडील राज्याचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणार- सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई : केंद्र सरकारकडे सामाजिक न्याय विभागाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव लवकरच सोडविणार असून त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यामार्फत दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

केंद्र सरकारकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रलंबित प्रस्तावांबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी डॉ. खाडे बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर व अधिकारी उपस्थित होते.

डॉ. खाडे म्हणाले, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरीता प्रलंबित असलेल्या 562 कोटी रुपयाच्या खर्चाला केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सुगम्य भारत अभियानांतर्गत सिपडा योजनेचे 15 कोटी 39 लाख रुपये,नागरी हक्क योजना व अत्याचार पिडीतास किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य, आंतरजातीय विवाह योजना, अनन्य विशेष न्यायालय याचे 76 कोटी 60 लाख रुपये याकरीता केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.

श्री. आठवले म्हणाले, केंद्र सरकारकडे राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित विषयाबाबत दिल्लीत पाठपुरावा केला जाईल. तसेच पुढील आठवड्यात याबाबत दिल्ली येथे बैठक आयोजित केली जाईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने (Queen Council) या निवासस्थानाचे स्मारकात रुपांतर करण्याबाबत जे आक्षेप घेतले आहेत त्या आक्षेपाचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.

Exit mobile version