Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातल्या ७५०० व्या जनौषधी केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जनौषधी दिवस समारोहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे. यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचे लोकार्पण करणार आहे. हे केंद्र शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात उभारण्यात आले आहे.

याच समारंभात मोदी ‘प्रधानमंत्री भारतीय जनौषधी’ परियोजनेच्या लार्भाथ्यांशी चर्चादेखील करणार आहेत.

लोकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषध मिळावीत यासाठी जनौषधी परियोजना सुरु झाली असून त्याबाबत जागृकता निर्माण व्हावी यासाठी देशभरात १ ते ७ मार्च हा आठवडा ‘जनौषधी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Exit mobile version