मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ९ हजार ६८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले, तर २२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यभरात काल ८ हजार ७४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख २८ हजार ४७१ झाली आहे. यापैकी एकूण २० लाख ७७ हजार ११२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाबळींची एकूण संख्या ५२ हजार ५०० वर पोचली आहे. राज्याच्या कोरोना मुक्तीदरात किंचित वाढ होऊन तो ९३ पुर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे, तर मृत्यूदर २ पुर्णांक ३६ शतांश टक्क्यावर स्थीर आहे.
सध्या राज्यभरात ९७ हजार ६३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
परभणी जिल्ह्यात काल १९ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ३ जणांचा कोरोनामुळे मत्यू झाला. जिल्ह्यात काल एकही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात ३०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात काल १७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात काल सात नव्या रुग्णांचीही नोंद झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्ह्यात काल २१ रुग्म कोरोनामुक्त झाले तर ७ नवे कोरोनाबाधित आढळले. सध्या जिल्ह्यात १६२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात काल ५१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काल जिल्ह्यातले ३४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात २ हजार ८४४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.