मुंबई (वृत्तसंस्था) : वीज महानिर्मिती कंपनीनं काल ९ मार्च रोजी १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती करून, औष्णिक वीज निर्मितीमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नीतीन राऊत यांनी औष्णिक वीज केंद्राची उत्पादन क्षमता भारांक, अर्थात प्लांट लोड फॅक्टर वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे,
राज्य वीज नियामक आयोगाने वीज केंद्रांची उत्पादन क्षमता, किमान ८५ टक्के असावी असं बंधन घातलं आहे. डॉ. राऊत यांनी ही क्षमता किमान ९० टक्के गाठण्याचं लक्ष्य ठरवून, कालबद्ध कार्यक्रम आखून वेळोवेळी आढावा घेतला. गुणवत्तापूर्ण कोळसा न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. डॉ. राऊत यांनी पदभार स्वीकारल्यावर औष्णिक वीज उत्पादन जवळपास दुपटीने वाढल असून, एकूण वीज उत्पादनात सुमारे ४ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे.