शर्जिल उस्मानी याने पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावं – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणाबाबत कार्यकर्ता शर्जिल उस्मानी यानं उद्या पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
याप्रकरणी उस्मानीवर दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाविरोधात त्यानं दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १६ तारखेला सुनावणी होणार आहे.
तोपर्यंत त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असेही निर्देश न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि\न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठानं दिले आहेत.
हिंदू समाज, भारतीय न्यायपालिका, संसद याविरोधात उस्मानीनं आक्षेपार्ह विधानं केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मात्र आपल्या भाषणापूर्वी किंवा नंतर कोणताही असंतोषपसरला नाही किंवा हिंसा झाली नाही असं सांगत त्यानं हा अहवाल मागं घेण्याची मागणी केली आहे.