मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका उपाय योजनांसाठी सज्ज झाली आहे.
शहरात समाज कल्याण विभाग आणि मेरी या २ ठिकाणी कोविड केंद्र पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त सातशे खाटा उपलब्ध होणार आहेत. आज नाशिक महापालिकेत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
या शिवाय महापालिकेने ३८ डॉक्टर सह एकूण २७६ वैद्यकीय कर्मचाऱयांची मानधनावर भरती केली आहे. १ हजार रेडमीसिवर इंजेक्शन खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.