अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीचा वापर थांबवू नये – जागतिक आरोग्य संघटना
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीमुळं रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं कुठही निदर्शनास आलेलं नसल्यानं, तशी भीती बाळगून कोणत्याही देशानं या लशीचा वापर थांबवू नये, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.
रक्तात गुठळ्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढण्याचा आणि लशीचा कोणताही संबंध नाही, असं या संघटनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मार्गारेट हॅरीस यांनी स्पष्ट केलं. अॅस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर काही जणांच्या रक्तात गुठळ्या निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर अनेक युरोपीय देशांनी या लशीचा वापर तात्पुरता स्थगित केला आहे.