Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम महत्त्वाचा असून याबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिली ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.

जगभरात अनेक देशांमध्ये इथेनॉल पेट्रोल मिसळलं जातं, मात्र वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेल्या इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाकडे २०१४ पर्यंत दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र मोदी सरकारनं या कार्यक्रमाचं पुनरुज्जीवन केल्यामुळे इंधनाची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विविध योजना राबवत असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत सांगितलं.

दरम्यान, लोकसभेचं कामकाज आज दुपारी एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. लोकसभेचे हिमाचल प्रदेशातील मंडी मतदार संघाचे विद्यमान खासदार दिवंगत राम स्वरुप शर्मा आणि माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहून कामकाज स्थगित करण्यात आलं. त्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांचे अधिकार वाढवणाऱ्या विधेयकाच्या विरोधात संसद भवनाच्या परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली.

Exit mobile version