नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातला २३ हजार ६५३ रुग्ण बरे झाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशातील १ कोटी ११ लाखाहून अधिक रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु गेले काही दिवस नव्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या देशात सातत्यानं वाढत आहे.
सध्या देशात २ लाख ८८ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरु असून हे प्रमाण २ पूर्णांक ४९ शतांश टक्के आहे.
गेल्या २४ तासात देशात ४० हजार ९५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकंदर कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख झाली आहे.
गेल्या २४ तासात देशात १८८ जणांचा कोविड–१९ मुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकंदर मृतांची संख्या १ लाख ५९ हजारांच्या पुढे गेली आहे.
देशात गेल्या २४ तासात १० लाख ६० हजार कोविड तपासणी चाचण्या करण्यात आल्या. त्त्यामुळे आत्तापर्यंत करण्यात आलेल्या एकंदर चाचण्यांची संख्या २३ कोटी २४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.