लसीकरणासाठी केवळ नोंदणी करून आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी – मुंबई महानगरपालिका
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला कोविड लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आरक्षित ठिकाण आणि वेळ मिळण्याची वाट न बघता लसीकरणासाठी केवळ नोंदणी करून आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
मुंबईत सरकारी रुग्णालयांव्यतिरिक्त ५९ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध असून लसीकरणासाठी पात्र नागरिक केवळ नोंदणी करून आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील असं महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.