नांदेड जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश जारी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात उद्यापासून येत्या ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील. या आदेशानुसार जिल्ह्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र यायला मनाई असेल, याशिवाय जिल्ह्यातली सर्व क्रिडांगणं, मोकळ्या जागा, उदयानं, सर्व प्रकारचे करमणुकीचे व्यवसाय, सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, उद्योग, व्यवसाय, बंद असतील.
कोरोना नियंत्रण व्यवस्थेसाठी उपयोगात असलेली उपहारगृह वगळून, इतर सर्व उपहारगृह, लॉज, हॉटेल्सक, बार, रिसॉर्ट, मॉल, बाजारपेठा, सर्व प्रकारची व्यावसायिक आस्थापनं आणि दुकानं बंद राहतील. घरपोच पुरवठ्यासाठी मात्र परवानगी दिली आहे.
यासोबतच कारखाने आणि उद्योगांच्या ठिकाणी मजुरांच्याय राहण्यायची आणि जेवणाची सोय सुरु ठेवता येणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सेवा वगळता सार्वजनिक आणि खाजगी प्रवासी वाहनांना बंदी घातली असून, पूर्व परवानगी असलेल्या आणि अत्यांवश्याक सेवेतल्या वाहनांनाचा परवानगी असणार आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आरक्षित प्रवासाचं नियोजन केलेल्यांना प्रवासाला परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात कोणतेही खाजगी, सार्वजनिक, राजकीय समारंभ, कार्यक्रम आणि आंदोलनांनाही या आदेशानुसार बंदी असेल. मात्र अंत्याविधीसाठी २० व्य्क्तींाना उपस्थित राहायला परवानगी दिली आहे.