आरोग्यविषयक कार्यासाठी बृहन्मुंबई महनगरपालिकेला केंद्रसरकारचे चार पुरस्कार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविषयक कार्यकर्तृत्वाचा गौरव काल नवी दिल्लीत करण्यात आला. केंद्र-सरकारद्वारे क्षयरोग नियंत्रण विषयक कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
काल संध्याकाळी नवी दिल्लीत झालेल्या एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते चार पुरस्कारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये एक रजत आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. यानिमित्तानं महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचं आणि संबंधित सर्व चमूचं अभिनंदन केलं आहे.