Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय तटरक्षक दलाची मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं काल मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई करत ३०० किलो हेरॉईन, पाच ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसं जप्त केली. एक विदेशी बोट अरबी समुद्रात अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करण्यासाठी येणार असल्याची माहिती तटरक्षक दलाला १५ मार्चला मिळाली होती. यानंतर ही संशयास्पद बोट शोधण्यासाठी सागरी आणि हवाई गस्त घातली जात होती. यादरम्यान श्रीलंकेच्या रवीहंसी या मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीवर छापा घालत ३०० किलो हेरॉईन आणि रायफली जप्त करण्यात आल्या.

या अंमलपदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातली अंदाजे किंमत ३ हजार कोटी रुपये आहे. गेल्या १५ दिवसांत भारतीय तटरक्षक दलानं केलेली ही दुसरी  मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षीही  तटरक्षक दलानं धडक मोहिमा राबवत ४ हजार ९ शे कोटी रुपये किमतीचे दीड टनांहून अमलीपदार्थ जप्त केले होते.

Exit mobile version