Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भांडूप दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत चौकशी करावी- देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : भांडूप इथल्या कोविड रुग्णालयातल्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत चौकशी करावी, असं मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं आहे. दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, तसंच इथल्या आगरोधक यंत्रणेची तपासणी का झाली नव्हती, याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपनेते किरिट सौमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. तर मनसे नेता संदीप देशपांडे यांनी ड्रीम्स मॉलला भोगवटा प्रमाणपत्र नसल्याकडे तसंच फायर ऑडिट झालं नसल्याकडे लक्ष वेधलं आहे.

Exit mobile version