Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार महिने हिवाळ्यासाठी बंद राहिलेला लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. “लेह – मनाली, लडाख प्रदेश देशाशी जोडला जाईल. चार उंच खिंडी, ४२८ किलोमीटरचा रस्ता दळवळणासाठी सीमा रस्ता संघटनेच्या हिमांक आणि दीपक प्रकल्पांच्या अभियंत्यांकरिता आणि कामगारांच्या दृष्टीने चालविणे नेहमीच एक आव्हानात्मक राहिलं आहे.

पूर्व लडाख भागातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेवून हा मार्ग डिसेंबरपर्यंत खुला ठेवण्यात आला होता. सर्वाधिक हिमवर्षाव असणारा टैगलांग ला खिंड संपूर्ण हिवाळ्यामध्ये खुली  ठेवण्यात आली होती. गोठवून टाकणाऱ्या तापमानात सीमा रस्ते संघटनेनं नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे दोन महिने अगोदर लेह मनाली मार्ग खुला करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Exit mobile version