Site icon साप्ताहिक एकच ध्येय

४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी उद्यापासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सोय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस उद्यापासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरीकांना उपलब्ध होणार आहे. १ जानेवारी १९७७ पर्यंत जन्माला आलेले लोक यासाठी पात्र असतील.

लसीकरण कार्यक्रमात सुलभता आणण्याच्या उद्देशानं इतर गंभीर आजार असल्यासच ४५ च्या पुढील व्यक्तीना लस देण्याची अट आता काढण्यात आली आहे. नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही नावनोंदणी करणं शक्य आहे.

कोविन पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी केलेली असल्यास पुन्हा खाजगी आणि शासकीय दवाखान्यात नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

रूग्णालयात लसीकरणा संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत नसल्यास १०७५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

Exit mobile version