उडान योजनेखाली गेल्या तीन दिवसांत २२ उड्डाणांचा आरंभ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘उडे देश का आम नागरिक’ म्हणजे उडान या योजनेअंतर्गत २२ नवीन विमानमार्ग केंद्र सरकारनं सुरू केले आहेत. ज्या भागांमध्ये दळणवळण कमी आहे त्यांना जोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
नवीन फेऱ्यांपैकी सहा मार्ग ईशान्य भारतातले आहेत.
आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत ३४७ मार्गांवर विमान वाहतूक सुरू आहे.
काल मेघालय मधल्या शिलॉंग इथून त्रिपुरामधल्या आगरताळा या मार्गावर विमान वाहतूक सुरू झाल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सांगितलं.
सोमवारी शिलॉंग ते सिल्चर या मार्गावर विमान सेवा सुरू झाली.