नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभेनं काल गुजरात धार्मिक स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. अपराध सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला 3 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. धर्मांतराच्या उद्देशानं महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आधीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. बळजबरीच्या धर्मांतराला विरोध करणारे अशा प्रकारचे कायदे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं आधीच संमत केले आहेत.