नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी मार्च महिन्यात एक लाख 23 हजार 902 कोटी रुपयांचं विक्रमी वस्तू आणि सेवा कर संकलन झालं आहे. गेल्या वर्षी मार्च महीन्यात जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये 27 टक्के जास्त जीएसटी जमा झाला आहे. देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासूनचं हे सर्वाधिक कर संकलन आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी अंतर्गत एक लाख कोटींपेक्षा जास्त संकलन होत असून, कोरोनानंतरच्या काळात देशाची आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत होत असल्याचंच हे द्योतक आहे असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.