आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजी विश्वविजेती मीराबाई चानू करणार भारताचं नेतृत्व
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ मध्ये पुरुषांची होणारी जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं होणार आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी ही घोषणा केली.
वेटलिफ्टिंग उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं १६ ते २५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजी विश्वविजेती मीराबाई चानू ही ४९ किलो वजनी गटात भारताचं नेतृत्व करणार आहे.
या स्पर्धेत मीराबाईच्या कामगिरीवर क्रीडा रसिकांचं विशेष लक्ष असून पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात १८ वर्षांच्या जेरेमी लालरीनुगा याच्या विजयाचीही अपेक्षा केली जात आहे.
गेल्याच वर्षी नियोजित असलेली ही स्पर्धा कोरोना संसर्गामुळं पुढे ढकलण्यात आली होती.