कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात ५ एप्रिल पासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जाणार आहे.
न्यायमुर्ती एस. एस शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपिठाने काल हा निर्णय घेतला. गौतम पटेल यांच्या एक सदस्यीय खंडपीठात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि प्रत्यक्ष, अशा दोन्ही माध्यामातून सुनावणी घेतली जाणार आहे. अन्य खंडपीठात मात्र प्रत्यक्ष सुनावणी केली जाणार आहे.