Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात ४७ हजार २८८ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २६ हजार २५२ रुग्णांनी या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ७५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८३ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे.

काल ४७ हजार २८८ रुग्णांची नोंद झाली. परवा पेक्षा हा आकडा १० हजारानं कमी आहे. राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ३० लाख ५७ हजार ८८५ झाली आहे. सध्या राज्यभरात ४ लाख ५१ हजार ३७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काल १५५ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५६ हजार ३३ झाली असून, मृत्यूदर १ पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे.

मुंबईत काल ३ हजार ३५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवलं. आतापर्यंत ३ लाख ७४ हजार ९८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ९ हजार ८५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ४ लाख ६३ हजार ३०२ झाली आहे. मुंबईतला रुग्ण दुरटीचा कालावधी ४० दिवसांवर आलाय. सध्या ७४ हजार ५२२ रुग्ण उपचार घेत आहेत. काल २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ११ हजार ७९७ वर पोचला आहे.

सांगली जिल्ह्यात काल २२९, तर आतापर्यंत ४८ हजार ६३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३६० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्ण संख्या ५३ हजार १४० झाली आहे. सध्या २ हजार ६९७ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात काल ४ हजार ३१३ रुग्णांनी या आजारावर मात केली. काल ४ हजार ६१९ नवे रुग्ण आढळले. काल जिल्ह्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यात काल बरे झालेल्या १४८ रुग्णांना घरी पाठवलं. जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २३ हजार २८४ झाली आहे. काल ५२४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून २९ हजार २३ वर गेली आहे सध्या जिल्ह्यात ५ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात या आजारामुळे ५३५ रुग्ण दगावले आहेत.

परभणी जिल्ह्यात काल ३७३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले काल ५५३ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा १६ हजार ८२६ वर पोहोचला आहे सध्या. जिल्ह्यात ३ हजार १७७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजाराने ४५१ रुग्णांचा बळी घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यात काल १ हजार १५, तर आतापर्यंत ३६ हजार ६५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ९०६ नवीन रुग्ण आढळल्यामुळे, रुग्ण संख्या ४८ हजार ५७५ वर गेली आहे. सध्या १० हजार ७५६ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ९२१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात काल अकराशे रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १ हजार ८४२ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुलडाणा, जिल्ह्यात काल बरे झालेल्या ९३२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात ३५ हजार ६६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. काल ६३४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून ४१ हजार ७०४ झाली आहे. सध्या ५ हजार ७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे २८७ रुग्ण दगावले आहेत.

नागपूर जिल्ह्यात काल ३ हजार ७०७, तर आतापर्यंत १ लाख ९८ हजार ६११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ३ हजार ५१९ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे, रुग्णांचा आकडा २ लाख ४५ हजार १२५ वर पोचला आहे. काल ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version