Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड-१९ चा सामना करण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातलं अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. त्यानुसार ५ हजार २०० वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीनं. उपलब्ध करुन देणं शक्य होणार आहे.

राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या २० एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीनं लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

राज्यातल्या विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या १५ हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचं काम तातडीनं पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या – त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील, असंही त्य़ांनी सांगितलं.

Exit mobile version