मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यानं लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम राखली असून लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची संख्या आज १ कोटीच्यावर जाऊन पोचली. आज दुपारी १२ च्या सुमाराला ही संख्या १ कोटी ३८ हजार ४२१ वर पोचल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं.
कोविन पोटर्ल दिलेल्या आकडेवारीनुसार, १ कोटीचा हा टप्पा ओलांडणार, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं ऱाज्य ठरलं आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं आहे.
काल २ हजार ८४९ सत्रांमधून एकूण २ लाख ८२ हजार ९४४ लाभार्थ्यांना मात्रा दिल्याचं आरोग्य विभागाच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे. काल पर्यंत एकूण ९९ लाख ३० हजार ४५० लाभार्थ्यांचं लसीकरण झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.