Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ पूर्णांक ११ शतांश टक्के झालं आहे. काल ५५ हजार ४११ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ झाली आहे.

सध्या राज्यभरात पाच लाख ३६ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.काल ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५७ हजार ६३८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७२ शतांश टक्के झाला आहे.

Exit mobile version