Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटन हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीडीआरआयला सुरुवात करणार

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण पायाभूत सीडीआरआय सेवा देण्यासाठी नवी दिल्ली येथील सचिवालय कार्यालय स्थापनेला कार्योत्तर मंजूरी दिली. यासंदर्भातला प्रस्ताव पंतप्रधानांनी 13 ऑगस्ट 2019 ला मंजूर केला होता.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ हवामान कृती परिषदेत दिनांक 23 सप्टेंबर 2019ला सीडीआरआय सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.  हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवालय यांच्यातर्फे संयुक्तरित्या आयोजित करण्यात येणार असून, अनेक राष्ट्रांचे प्रमुख हवामान बदल आणि आपत्ती निवारण या विषयावर एकत्रित येऊन आपले उच्चस्तरीय विचार सीडीआरआयसाठी देतील.

खालील प्राथमिकतेवर मिळालेल्या मंजूरी :

  1. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सीडीआरआय आणि आंतरराष्ट्रीय सचिवालय कार्यालयची स्थापना
  2. नवी दिल्ली येथे ‘सोसायटीज्‌ नोंदणी कायदा 1860’ अंतर्गत, सीडीआरआय सचिवालय सोसायटी म्हणून स्थापन करणार किंवा जे उपलब्ध नाव असेल त्या नावानुसार स्थापन करण्यात येईल. सहकार्य आणि सीडीआरआय सोसायटीचे उपनियम तयार करुन त्याला अंतिम स्वरुप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) देईल.
  3. वर्ष 2019-20 ते 23-24 पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीत 480 कोटी रुपयांचा निधी भारतातर्फे सहाय्यक निधी म्हणून तंत्रज्ञान सहाय्य आणि संशोधन प्रकल्पासाठी सीडीआरआयला देण्याची मंजूरी देण्यात आली आहे.
Exit mobile version