Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्यानं आजपासून मुंबईतल्या निर्देशित ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले.

मुंबईत महानगरपालिका आणि राज्य शासनानं ४९, तर खासगी रुग्णालयांमध्ये ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित केलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचं लसीकरण केलं जातं.

लसीचा साठा कमी असल्यानं खासगी रुग्णालयांमधलं लसीकरण परवा आणि काल थांबलं होतं. पालिकेच्या तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होतं.

Exit mobile version