जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन
Ekach Dheya
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ॲबे यांचे आभार मानले.
दूरध्वनीवरील संवादात दोन्ही नेत्यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा उल्लेख केला आणि शांती, प्रगती आणि समृद्धीबाबत असलेला समान दृष्टिकोन साध्य करण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पुढल्या महिन्यात ओसाका इथे होणाऱ्या जी-20 देशांच्या परिषदेत होणाऱ्या भेटीसाठी दोन्ही पंतप्रधान उत्सुक आहेत.
यावर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी भारतात येणाचे आमंत्रणही पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ॲबे यांना दिले आहे.