नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या अनेक लहानमोठ्या कामांमध्ये हातभार लावत ती अधिक चांगल्या रीतीने केली जावी आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. सहा राज्यांमधील शंभर गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उतपादन मूल्य कमी होणार असून शेती करणं अधिक सुकर होणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
शेती अधिक स्मार्ट आणि सुनियोजित पद्धतीनं व्हावी यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात येणार असून पिकांचं कापणीपश्चात व्यवस्थापन आणि वितरण यासाठीही ती उपयुक्त ठरणार आहे. या करारामुळे डिजिटल शेतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना प्रत्यक्षात येत आहे. मोदी यांनी पाताप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पना उचलून धरली होती. त्या दिशेनं परायात्नापूर्वक टाकण्यात आलेल्या पवालांचीच ही फलश्रुती आहे, असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी यावेळी सांगितलं.