Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बेडसची संख्या वाढवायचा निर्णय – पालिका

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बेडसची संख्या वाढवायचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यानुसार पालिका रुग्णालयं, जम्बो रुग्णालयांतले बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. तसंच खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स ताब्यात घेतले आहेत.

लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांबरोबर टायअप करत पंचतारांकित हॉटेल्समध्ये उपचारांची सुविधा सुरू केली आहे. बीकेसीतील ट्रायडंटमध्ये रिलायन्स रुग्णालयाच्या मदताने २० बेड आणि मरीन ड्राईव्ह येथील इंटर काँटिनेंटल हॉटेलमध्ये बॉम्बे रुग्णालयाच्या मदतीने २२ बेड उपलब्ध करून दिले आहेत.

सेव्हन हिल्समध्ये ३० आयसीयू बेड उपलब्ध झाले असून येत्या आठवडाभरात नेस्को कोरोना केंद्रात दीड हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार असल्याची  माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.

Exit mobile version