Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा १२ कोटी २५ लाखांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा १२ कोटी २५ लाखांचा टप्पा पार झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या ९२ व्या दिवशी काल रात्री ८ वाजेपर्यंत लसींच्या एकंदर २५,६५,१७९ मात्रा देण्यात आल्या.

आतापर्यंत लसीकरण झालेल्यांमध्ये  ९१,२७,००० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून ५७ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे.

या व्यतिरिक्त आघाडीवर काम करणाऱ्या १ कोटी १२ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा , तर याच गटातल्या जवळपास ५५,००,००० लाख कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

४५ ते ६० वर्षं वयोगटातल्या चार कोटींहून अधिक लाभार्थींनी  लसीची पहिली मात्रा  घेतली असून १०,००,००० जणांनी दुसरी मात्राही घेतली आहे.

Exit mobile version