Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वर्ध्यात प्रति दिवस ४० हजार रेमेडमसेवीर इंजेक्शन निर्मिती करणारा प्रकल्प सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात रेमेडमसेवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वर्ध्यात ४० हजार इंजेक्शन प्रति दिवस निर्मिती करणारा प्रकल्प सुरु केला आहे, अशी माहिती केद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी दिली. ते काल नागपूर इथं व्हडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बोलत होते.

नागपूर शहरात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सुरू केल्याचं ते म्हणाले.

विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना इंजेक्शनचा पुरवठा करायला आधी प्राधान्य असेल, त्या नंतर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांना याचं वितरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

विविध उद्योग समूहाकडून अशा संकटसमयी निधीची आवश्यकता असून, त्यासाठी उद्योगांनी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

नागपूर इथं कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या कामांची त्यांनी माहितीही दिली. यावेळी महपौर दयाशंकर तिवारी हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version