Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा याची सुनिश्चिती करण्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी पुरवठादारांची साखळीही अबाधित राहील याची देशातल्या औषध उत्पादन उद्योग क्षेत्रानं सुनिश्चिती करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांनी औषध उत्पादन उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

औषधं आणि वैद्यकीय साधनांच्या वाहतुकीसाठी सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना, औषध उत्पादन क्षेत्रानंही गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवले, तसंच रेमडेसिवीर इंजक्शनचे दर कमी केले याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. अशा प्रयत्नांमुळेत भारत जगाचं औषध केंद्र म्हणून ओळखला जात आहे, आणि कोरोना काळात दीडशेहून अधिक देशांना मदत करू शकला आहे असे ते म्हणाले. यावेळी औषधं उत्पादन उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकार करत असलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांचे आभार मानले.

प्रधानमंत्री आज कोविड प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या उद्योजकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता ही बैठक होणार आहे. या क्षेत्रातल्या तज्ञ गटाबरोबरची ही तिसरी बैठक असेल.

Exit mobile version