Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निकडीची गरज म्हणूनच टाळेबंदीचा विचार करावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा राज्यांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री देशाला संबोधित करत होते. देशाला संकल्प, साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले.

नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करावं, देश या आपत्तीतून नक्कीच बाहेर पडेल, आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू, मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घरातल्या बालकांनी आपल्या आईवडिलांना विनाकारण घराबाहेर जाऊ देऊ नये, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. कोविडवरच्या औषधांसह प्राणवायूचं उत्पादन वाढवण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या कामगारांनी स्थलांतर न करता, आहेत त्या ठिकाणीच थांबावं. कामगारांचं काम बंद होणार नाही, तसंच ते असतील तिथेच त्यांना कोविड लस मिळेल, असंही ते म्हणाले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाच्या त्रीसुत्रीचं पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

Exit mobile version