नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे.
गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण या समित्यांवर निवड झाली आहे. तीन वर्षांसाठी ही निवड असून १ जानेवारी २०२० पासून भारताचा कार्यकाळ सुरू होणार आहे.
ऑस्ट्रिया, बहरीन, बेलारूस, बल्गेरिया, कॅनडा, फ्रान्स, घाना, लिबिया, पाकिस्तान, कतार, थायलंड, टोगो आणि अमेरिका यांची संयुक्त राष्ट्रांकडून तर ब्राझील, डॉमिनिकन प्रजासत्ताक, पॅराग्वे, चिली, क्युबा यांची गुप्त मतदानाद्वारे निवड निवड करण्यात आली.
जागतिक अन्न कार्यक्रम समितीवर फ्रान्स, घाना, कोरिया प्रजासत्ताक, रशिया आणि स्वीडन यांची निवड करण्यात आली आहे.