देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ९२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली तर ५८ लाख लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
देशात काल ३ लाख १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे. त्यामुळे देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी ५९ लाख झाली आहे. काल दोन हजार १०४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जवळपास ७८ हजार रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक कोटी ३४ लाखांहून अधिक रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या देशभरात २२ लाख ९१ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.