Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न होताना दिसत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या कोविड आढावा बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली.

अलिबाग नगरपालिका देखील पुढे सरसावली असून पालिकेचयवतीने कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात रॅपिड अॅन्टिजन टेस्ट, आरटीपीसीआर, कोविड अॅन्टीबॉडी अशा वैद्यकीय चाचण्या सरकारने ठरवून दिलेल्या दरात करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.

आमदार महेंद्र थोरावे यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलला १०० बेडचे कोविड रूग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे.

Exit mobile version