मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतरच त्यांना रुग्णालायत खाटा द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होत असल्यामुळे रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आवश्यकता असलेल्यांना वेळेवर खाटा मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी जाऊन केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या स्तरावर प्रत्येकी १० तपासणी टीम आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ करावी असंही या निर्देशात म्हटलं आहे.