Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणानं गाठला दीड कोटीचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यानं सोमवारी आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून राज्यानं दीड कोटी मात्रांचा टप्पा गाठला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात लसीच्या ५ लाख ३४ हजार ३७२ विक्रमी संख्येनं मात्रा देण्यात आल्या.

३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार सातशे ३२ नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्रानं राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. काल राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं.

अशाच पद्धतीनं लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात एकूण दीड कोटींच्या वर मात्रा देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version