Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प हा मुंबईतील आकर्षण ठरणार – आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प हा मुंबईतील नवीन आकर्षण ठरणार असून विविध धर्मीय स्थळांना देखील तो जोडणारा ठरेल.

मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना सर्व संबंधीत यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तसंच  मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.

या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं आदित्य ठाकरे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्राथमिक संकल्पनेनुसार हा प्रकल्प सुमारे ४ पूर्णांक ७७ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅक या दोन्ही बाबी समाविष्ट असतील. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी देखील हा प्रकल्प आकर्षणाचा भाग ठरेल.

Exit mobile version